Book a Call

Edit Template

ग्रंथालयांची माहिती

पुणे मराठी ग्रंथालय संस्था – एक ज्ञानाचा दीपस्तंभ

पुणे शहराच्या हृदयस्थानी कार्यरत असलेली पुणे मराठी ग्रंथालय संस्था ही गेली अनेक दशके ज्ञान, वाचनसंस्कृती आणि साहित्यसेवेचा दीप प्रज्वलित करत आहे. संस्थेच्या ग्रंथसंपदेमध्ये १.७५ लाखांहून अधिक मराठी ग्रंथ, ललित साहित्य, संदर्भग्रंथ आणि मागील शतकातील अमूल्य नियतकालिके यांचा समावेश आहे.

संस्थेमध्ये कार्यरत विविध विभाग – मुक्तद्वार वाचनालय, बालविभाग, संदर्भ सेवा व ग्रंथ देवघेव केंद्र – हे सर्व समाजातील प्रत्येक वयोगटातील वाचकांसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले करतात.

सन १९६२ पासून सुरु झालेल्या अभ्यासिका विभागाचा आज ११०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळतो असून गेल्या ४८ वर्षांत ५०,००० हून अधिक विद्यार्थी येथे अध्ययन करून यशाच्या दिशेने वाटचाल केली आहे. याचप्रमाणे, संस्थेच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून उन्हाळी सुट्टीत ‘मोफत वासंतिक बालवाचनालय’ हे पुणे शहरात व जिल्ह्यात ४० ठिकाणी राबवले जातात.

संस्थेच्या यशस्वीतेचा आणखी एक भाग म्हणजे वाचक-साहित्यिक संवाद, व्याख्यानमाला, परिसंवाद, वाचकसभा, तसेच विविध पुरस्कार वितरण समारंभ – जे साहित्य आणि समाज यांच्यात सेतू निर्माण करतात.

सन १९९० साली ६३ वे आणि २००२ साली ७५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषवण्याचा मानही ग्रंथालयास लाभला आहे.

दखल

संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन:

संस्थेच्या कामकाजाच्या वेळा

कार्यालय वेळ

सकाळी ८.३० ते रात्री ८.००

पुस्तके व मासिके देवघेव

सकाळी ८.३० ते रात्री ८.००

विद्यार्थी अभ्यासिका

सकाळी ७. ०० ते रात्री ११. ००

शुल्क (वर्गणी ) सीकरण्याची वेळ

सकाळी ८.३० ते रात्री ७.३०

मुक्तव्दार वाचनालय

सकाळी ८.०० ते दुपारी १२.००
सायंकाळी ५.०० ते  रात्री ८.००
(दर रविवारी एक तास अधिक)

साप्ताहिक सुट्टी

दर  रविवारीअभ्यासिका व मुक्तव्दार वाचनालय आठवड्याचे सातही  दिवस चालू 

Feedback

लोकांचे अभिप्राय

News & Posts

Latest News & Posts

  • All Post
  • Children's Books
  • Education/Reference
  • Mystery/Thriller
  • Religion/Spirituality
  • Science/Technology
See More

End of Content.

Contact

© 2025 Pune Marathi Granthalaya. All Rights Reserved |  Powered By Setupnew Infotech